संरक्षणमंत्रालयाकडून पुणे कॅन्टोन्मेंटला १५ कोटींचा निधी मंजूर

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार म्हणाले की, संरक्षण मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे. पुणे कॅन्टोन्मेंटला मिळालेल्या निधीतून पुढील दोन ते तीन महिन्यांचा खर्च भागविता येऊ शकेल. कारण बोर्डाच्या कर्मचार्यांचा पगार आणि पेन्शनसाठी त्यापैकी आठ कोटी रुपयांचा निधी वितरीत होईल.

    पुणे : संरक्षण मंत्रालयाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी १५ कोटी आण देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी साडेचार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीव्दारे बोर्ड प्रशासनाला त्यांच्या कर्मचार्यांचे पगार, प्रशासकीय कामे, विकासाची कामे करण्यासाठी करता येणार आहेत. निधीला मंजूरी मिळाली असून, पुढील दहा ते पंधरा दिवसांत दोन्ही बोर्डांच्या खात्यात पैसे जमा होतील.

    पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार म्हणाले की, संरक्षण मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे. पुणे कॅन्टोन्मेंटला मिळालेल्या निधीतून पुढील दोन ते तीन महिन्यांचा खर्च भागविता येऊ शकेल. कारण बोर्डाच्या कर्मचार्यांचा पगार आणि पेन्शनसाठी त्यापैकी आठ कोटी रुपयांचा निधी वितरीत होईल. दरम्यान, बोर्डाच्या अन्य प्रशासकीय कामांसाठी देखील निधीचा उपयोग होईल. दरम्यान, बोर्डाच्या हद्दीतील खराब झालेल्या इमारतींबाबत संबंधीत नागरिकांना नोटीसा बजावण्यात येत आहेत. मॉन्सूनच्या दरम्यान दरवर्षी धोकादायक ठरणार्या इमारतींबाबतचा आढावा बोर्ड प्रशासन घेत असते. त्यानुसारच नोटीसा बजावण्यात येत आहेत.