वीजपुरवठा खंडीत झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

मंचर ः आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने विजेचे खांब व तारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळे गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पिण्यासाठी पाणी आणण्याची पाळी अवसरी, मेंगडेवाडी येथील ग्रामस्थांवर आली.

मागील दोन दिवसापासून आंबेगाव तालुक्याचा पूर्व भागात विजेचा पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी विद्युत मोटर लाईट अभावी बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा सुटला होता. या वाऱ्याने अनेक झाडे पडली.तसेच विजेचे खांबही पडले. अनेक घरांचे नुकसान झाले.घरावरील पत्रे व जनावरांच्या शेडचे पत्रे उडाले आहेत.सर्वाधिक फटका वीज वाहतुकीला झाला असून विजेचे खांब पडले आहेत. तारा तुटल्या आहेत.त्यामुळे अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.विजेअभावी जनावरांच्या पिण्यासाठी तसेच माणसांनाही पिण्यासाठी विहिरी बोरवेलचे पाणी मोटरने उपसता येत नाही. त्यामुळे हात पंप किंवा विहिरीतून पाणी काढून पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी वापरावे लागत आहे. वीज वितरण कंपनीने ताबडतोब या परिसरातील तारा जोडून वीजपुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी  ग्रामस्थांनी केली आहे.