“मागेल त्याला शेततळे” योजनेचे अनुदान त्वरित देण्याची मागणी

कर्जत : कर्जत जामखेड तालुक्यातील मागेल त्याला शेततळे याचे अनुदान त्वरित देण्यात यावे यासाठी भाजपाच्या वतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन दिले.

कर्जत : कर्जत जामखेड तालुक्यातील मागेल त्याला शेततळे याचे अनुदान त्वरित देण्यात यावे यासाठी भाजपाच्या वतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन दिले. या निवेदनावर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, किसन मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, तालुका उपाध्यक्ष पप्पू धोदाड, रामदास हजारे आदी च्या सह्या आहेत.

भाजपाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे एक वर्षा पासून ” मागेल त्याला शेततळे ; या कृषी विभागाच्या योजनेचे साडे तीन कोटीचे अनुदान थकले असून कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी व कृषी चे सर्व अधिकारी शेततळे चे अनुदान कधी मिळेल या बाबत टाळाटाळीचे उत्तरे देऊन अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना भुलवीत असून हे अनुदान मिळण्यासाठी कर्जत जामखेड च्या आमदार साहेबाची भेट घ्या किंवा त्यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज करा असा अजब परंतु कोणाच्या तरी आदेशाने हा सल्ला देत असून कृषी विभाग कोणाचे महत्व वाढवत आहे..? हा प्रश्न उपस्थित होत असून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी फक्त याच लोकप्रतिनिधींकडे आपली समस्या मांडावी व विरोधी पक्षांकडे कुठलाही मुद्दा जाऊ नये यासाठी केलेले हे षड्यंत्र असून..भारतीय जनता पार्टी हे षड्यंत्र उधळून लावल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही व एका सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहील व जोपर्यन्त कृषी विभाग शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान वितरित करीत नाही तोपर्यंत आवाज उठवत राहील …’ दादा..सर्वात आधी कर्जत जामखेड च्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा व मग महाराष्ट्र व देशाची काळजी करा “..तरच आपण भावी नेतृत्व बनू शकता…अन्यथा सब भुल भुलैय्या हो जायेगा…!!!