कांदा निर्यात बंदी उठविण्याची  मागणी

दौंड : दौंड तालुक्यातील कृषी पदवीधर संघटनाच्या पदविका आघाडीकडून कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत मंगळवार (ता.२२) रोजी तहसीलदार एस. पाटील यांना निवेदन देण्यात दिले. यावेळी निवेदन देताना कृषी पदवीधर आघाडी कृषी पदवीधर संघटनेचे तालुका अध्यक्ष विशाल शिराळ, तालुका उपाध्यक्ष सुधीर रासकर, शुभम बनसुडे उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले.

दरम्यान, दर दोन वर्षांनी अवकाळी पाऊस, लॉकडाऊनमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे, शेतकऱ्यांच्या संकटात वाढ म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्माण घेतला आहे, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त केला. देशातील कांदा उत्पादक शेतकरी यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठवावी अशा मागणीचे लेखी निवेदन दौंड तहसीलदार एस. पाटील यांना दिले.