स्थानिक महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी

शिरूर : औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये स्थानिक महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्यावतीने शिरूरच्या तहसिलदार यांना निवेदन देवुन करण्यात आली.यावेळी

शिरूर : औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये स्थानिक महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्यावतीने शिरूरच्या तहसिलदार यांना निवेदन देवुन करण्यात आली.यावेळी यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या सचिव नम्रता गवारे,पुष्पा जाधव,शारदा भुजबळ,ज्योती गेजगे,प्रियंका अभंग आदि उपस्थित होते.

                 यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,स्यानिक बेरोजगार तरूणांना प्रशासनाच्यावतीने औद्योगिक वसाहतीत रोजगार उपलब्ध करून देण्याचे काैतुकास्पद काम सुरू केले आहे.परंतु महिलांना ५० टक्के आरक्षण असुनही महिला संघटना बचत गटांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसुन येत आहे. यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्यावतीने तालुक्यातील शेकडो महिलांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिलेले आहे.लोणचे,पापड,मसाले,खाद्यपदार्थ,कापडी पिशव्या,फिनेल,निरमा पावडर,साबण,वेगवेगळ्या प्रकारचे पिठ,तेल,भांडी साफ करण्याचे लिक्वीड,भाजीपाला,मास्क आदी घर सांभाळुन देवु शकत असल्याने रांजणगाव,कारेगाव औद्योगिक वसाहतीतील व परिसरातील कंपन्यांना बचत गटांचा माल घेण्याबाबत आदेश देवुन स्थानिक महिला संघटना बचत गटांना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करून द्यावा असे शिरूरचे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.