कासारी येथे तीव्र पाणीटंचाई, पाण्याअभावी पिके जळू लागल्याने चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी

शिक्रापूर : कासारी ता. शिरूर सह निमगाव म्हाळुंगी लघू वितरीकेतून चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी कासारीच्या सरपंच सुनीता भुजबळ यांनी निवेदनाद्वारे चासकमानच्या शाखा अधिकाऱ्यांकडे केली आहे. कासारी ता.

शिक्रापूर : कासारी ता. शिरूर सह निमगाव म्हाळुंगी लघू वितरीकेतून चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी कासारीच्या सरपंच सुनीता भुजबळ यांनी निवेदनाद्वारे चासकमानच्या शाखा अधिकाऱ्यांकडे केली आहे.

कासारी ता. शिरूर येथील सरपंच सुनीता भुजबळ यांनी चासकमानच्या शाखाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार डीवाय १३ या लघुवीतरिकेतून चासकमानच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे.  लघु वितरिकेमधून पाणी सोडून  कासारी गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेले गावतळे भरून घेण्यात यावे. उन्हाळ्यामुळे सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही पाण्याची कमतरता जाणवू  लागली असून उभी पिके व  जनावरांचा चाराही जळून गेला आहे. त्यामुळे तातडीने चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी सरपंच सुनीता भुजबळ,  सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.  तर यापूर्वी देखील परिसरातील नागरिकांनी पाणी सोडण्याबाबत आपल्याकडे अर्ज केलेला आहे तरीही त्याची दखल घेतलेली नाही. तरी तातडीने या लघु वितरीकेतून पाणी सोडण्याचे नियोजन करून पूर्णक्षमतेने पाणी सोडण्याची मागणी सरपंच भुजबळ यांनी केली आहे.