मंचर-पारगांव रस्त्यावरील बाभळीच्या झाडाचे खोड बाजुला करण्याची मागणी

मंचर : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील टेमकर वस्तीजवळ मंचर-पारगांव रस्त्यालगत असलेल्या बाभळीच्या झाडाच्या खोडाच्या फांद्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

 मंचर : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील टेमकर वस्तीजवळ मंचर-पारगांव रस्त्यालगत असलेल्या बाभळीच्या झाडाच्या खोडाच्या फांद्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बाभळीच्या झाडाचे खोड बाजुला करावे,अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

पंधरा दिवसापुर्वी अवसरी खुर्द परिसरात चक्रीवादळामुळे मंचर-पारगांव रस्त्यावरील टेमकर वस्ती येथे बाभळीचे झाड रस्त्यावर कोसळले.त्यामुळे वाहतुक बंद पडली.सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेले बाभळीचे झाड काढण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु संबधित खात्याने लक्ष न दिल्याने ग्रामपंचायत अवसरी खुर्द यांनी सदर झाड काढल्याने वाहतुक सुरळीत झाली. परंतु झाड काढताना त्याच्या खोडाच्या फांद्या मात्र तशाच आहेत. झाडाच्या खोडावरील फांद्या तोडल्या असल्या तरी खोडाचा भाग मात्र रस्त्यावर तसाच आहे. रस्त्यास असणारे वळण आणि झाडाच्या खोडाचा भाग तसाच राहिल्याने अपघातांना निमंत्रण दिल्याची शक्यता वाहनचालकांनी वर्तवली. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक अवस्थेत राहिलेले बाभळीचे झाड आणि त्याचे खोड रस्त्यापासुन बाजुला करावे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.