उद्योजकांवर लादलेला ‘तो’ एलबीटी रद्द करण्याची मागणी ; तीन हजार उद्योजकांना एलबीटी भरण्याच्या नोटीस

पिंपरी :पिंपरी चिंचवड़शहरातील उद्योजकांना आता स्थानिक संस्था कर (एलबीटी) च्या नोटीस शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. ३ हजारपेक्षा अधिक उद्योजकांना या नोटीस पाठविल्या आहेत. तीन वर्षांच्या या नोटीस असून १५ दिवसांत कर भरण्याच्या सूचना त्यात नमूद आहेत. कर न भरल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे उद्योजकांवर आर्थिक भुर्दंड पडणार असून, हा कर माफ करण्याची मागणी भाजपा उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखील काळकुटे यांनी केली आहे.

कोरोनाची महामारी व त्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योजकांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामध्येच विविध कर भरून उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना प्रभाव सध्या कमी होऊन लॉकडाऊन देखील उठले आहे. उद्योजक सावरत असतानाच आता त्यांना पुन्हा स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्याच्या सुचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. तीन हजार पेक्षा अधिक उद्योजकांना ऑनलाईन नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

नोटीस मध्ये तीन वर्षांचा कर भरण्याच्या सुचना आहेत. २०१३ – १४, २०१४ – १५, २०१५ ते २०१६ या तीन वर्ष कालावधीचा कर द्यायला सांगितला आहे. कर भरण्याची मुदतही १५ दिवस देण्यात आली आहे. अन्यथा दंड आकारण्यात येणार आहे. शहरातील ३ हजार उद्योजकांना सुरुवातीला नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. तर उर्वरित आणखी उद्योजकांनाही ऑनलाईन नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने देण्यात आली. शासनाच्या या नोटीस मुळे उद्योजकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कोरोनामुळे उद्योग बंद होते. ९ महिने मोठे नुकसान शन करावे लागले आहे. आता कुठे उद्योजक उभा राहत असताना स्थानिक संस्था कर भरायचा कसा असा सवाल उद्योजक उपस्थित करत आहेत. हा कर माफ करावा अशी मागणी उद्योजक करत आहेत. हा कर माफ केल्यास उद्योगाला चालना मिळेल, असेही काळकुटे यांनी म्हटले आहे.

-एलबीटीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना मागणी

उद्योजकांना आकारण्यात येणारा तीन वर्षासाठीचा हा कर रद्द करावा अशी मागणी भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. शहराध्यक्ष निखिल काळकुटे यांनी या बाबत स्थानिक संस्था कर कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी , राजेंद्र देशपांडे यांना निवेदन दिले. या वेळी संजीवकुमार मैदगिरी, नितीन यादव, किशोर चौधरी, अतुल इनामदार, रोहित रणभोर, किशोर पवार, सुनील कोर्पे, अविनाश नाईक, सतीश बोरा आदी उपस्थित होते.