गावठी कोंबडयांना मागणी वाढली

मंचर : आंबेगाव तालुक्यात मांसाहार करणाऱ्या गावठी कोबड्या मिळेनाशा झाल्या आहेत.

 ज्यादा भाव देवुनही कोंबडया मिळेनाशा झाल्या

मंचर : आंबेगाव तालुक्यात मांसाहार करणाऱ्या गावठी कोबड्या मिळेनाशा झाल्या आहेत. पाचशे ते सहाशे रूपये देवुनही गावठी कोंबडया मिळणे दुरापस्त झाले आहे. फार पूर्वीच्या काळापासून वाडी-वस्तीवर कोंबड्या व बकरे पाळण्याची प्रथा आहे. पूर्वी घरोघरी कोंबड्या-बकऱ्या पाळायचे. परंतु आता काही ठराविक ठिकाणी शेतकरी कुक्कूटपालन आणि शेळीपालन करताना दिसतात. पुणे-मुंबई येथुन आलेल्या शहरी नागरिकांनी मांसाहारी पाटर्यावर जोर दिला आहे.त्यामुळे गावठी कोंबडया ज्यादा पैसे देवुनही मिळत नसल्याचे चिकन खवय्यांनी सांगितले. लाँकडाऊनच्या काळात पुणे, मुंबई व इतर शहरांतून गावी राहण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाडी-वस्तीवर असणारी शेतकऱ्यांची कुक्कुटपालनाची खुराडी रिकामी केली. तसेच बोकडही कापून खाल्याने गावठी कोंबडया आणि बोकडही दुर्मिळ झाले आहे. पुण्या-मुंबईतुन गावी दाखल झालेल्या नागरिकांनी मिळेल ती किंमत देत कोंबड्या व बकरे खरेदी करून मांसाहारी पाट्र्या केल्याने वाडीवस्तीतील शेतकऱ्यांची खुराडी रिकामी झाली आहे. बाजारात आता गावठी कोंबडी पाहायला मिळत नाही. कितीतरी तरुणांनी गावठी कोंबडी सारख्या कावेरी, गिरीराज, वनराज अशा प्रति जाती निर्माण करून त्या गावठीच्या भावात विकल्या गेल्या. त्यामुळे आता ग्रामीण भागात कुठेच गावठी कोंबड्या दिसेनाशा झाल्या आहेत,अशी माहिती कळंब येथील व्यापारी इसाक शेख यांनी दिली.