वीज बील माफ करण्याची मागणी

शिरूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे नागरीकांचे व्यवसाय बंद असल्याने अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे शहरवासियांची घरपट्टी,पाणीपट्टी माफ करण्याची मागणी शिरूर शहर भाजपच्यावतीने

शिरूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे नागरीकांचे व्यवसाय बंद असल्याने अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे शहरवासियांची घरपट्टी,पाणीपट्टी माफ करण्याची मागणी शिरूर शहर भाजपच्यावतीने शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना व वीज बील माफ करण्याच्या मागणीचे निवेदन शिरूर महावितरणचे सहाय्यक अभियंता यांना देऊन करण्यात आली.यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक नितीन पाचर्णे,नगरसेवक संदिप गायकवाड,माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे,प्रमोद गायकवाड,विजय नर्के,हुसेन शहा,रेश्मा शेख उपस्थित होते.

शिरूर शहर भाजपच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मार्च २०२० पासून संपूर्ण विश्वामध्ये कोरोना या भीषण आजाराने थैमान घातले आहे. तसेच आपल्या भारत देशामध्ये २१ मार्च पासून पूर्णतः लॉकडाऊन आहे.आणि त्यामुळे सर्व नागरिकांचे व्यवसाय, नोकरी, धंदे बंद आहे. गेले अनेक महिने संपूर्ण कमाई बंद आहे. सर्वनाच आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.आजूनही परिस्थिती सुधारलेली नसल्याने नागरिक मोठ्या संकटामध्ये सापडलेले असुन सन २०२०-२०२१ या कालावधीतले घरपट्टी व पाणीपट्टी तसेच मार्च २०२० ते जून २०२० पर्यंतचे वीज बील सर्वांचेच माफ करण्याची मागणी दि.२४ रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे.