सुरक्षित अंतर आणि अत्यावश्यक काळजी घेऊन परीक्षा घेण्याची पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांची मागणी

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या अंतिम निर्णयाची अनेकजण वाट पाहत आहेत. आधी राज्य सरकारने परीक्षांऐवजी श्रेणी पद्धतीचा उपयोग करण्याचा

 पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या अंतिम निर्णयाची अनेकजण वाट पाहत आहेत. अशातच पुण्यातील शिक्षण संस्थांनी परीक्षा घ्या, सीईटी नको. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पणाला लावू नका, अशी मागणी केली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. आधी राज्य सरकारने परीक्षांऐवजी श्रेणी पद्धतीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यपालांनी तो निर्णय प्रलंबित ठेवल्याने सध्या संभ्रमाची स्थिती आहे.

यावेळी या शिक्षण संस्थांनी राज्य सरकारला कोणताही निर्णय घेताना शिक्षण संस्थांना विश्वासात घ्यावं, असं आवाहन केलं आहे. महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला अनेक विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा आहे, तर राज्यपाल, भाजप आणि काही संघटनांनी विरोध केला आहे. त्यातच आता पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांनीही परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. 

संबंधित शिक्षण संस्थांनी म्हटलं आहे की, “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या नाही, तर या विद्यार्थ्यांवर कोरोना बॅचचा शिक्का बसेल. पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश त्याचबरोबर नोकरीमध्ये देखील अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा घ्याव्यात. विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा यंदा रद्द करुन पूर्वीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी द्यावी.”