पुण्यातील ‘शिवाजी नगर’  भागाचे नाव बदलून ‘हे’ नाव देण्याची मागणी

मुंबईमधील दादर येथ असलेले ऐतिहासिक शिवाजी पार्क देखील आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' म्हणून ओळखले जाणार आहे. तसा प्रस्ताव देखील मुंबई महानगरपालिकेने पारित केला आहे. त्याच धर्तीवर शिवाजीनगर चा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज नगर” असे फाउंडेशननी म्हटले आहे.

    पुणे: महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी यांचे योग्य तो सन्मान राखला जावा. त्यांच्या नावाचा आदरपूर्वका उल्लेख केला जावा यासाठी पुण्यातील शिवाजी नगर परिसराचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज नगर” असा करण्यात यावा अशी मागणी पुणेकरांच्या वतीने सिद्धी कर्मयोगी फाउंडेशनने केली.

    मुंबईमधील दादर येथ असलेले ऐतिहासिक शिवाजी पार्क देखील आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ म्हणून ओळखले जाणार आहे. तसा प्रस्ताव देखील मुंबई महानगरपालिकेने पारित केला आहे. त्याच धर्तीवर शिवाजीनगर चा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज नगर” असे फाउंडेशननी म्हटले आहे.

    सिद्धी कर्मयोगी फाउंडेशनतर्फे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महापौर, पुणे महानगरपालिका, सहआयुक्त, पुणे महानगरपालिका देण्यात आले आहे.