पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नारायणगाव: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा,अशी मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केली आहे.

 नारायणगाव: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा,अशी मागणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केली आहे. नारायणगाव (ता. जुन्नर) पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कार्य आणि त्यांची राजकीय कारर्कीद लक्षात घ्यायला हवी होती. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात कोरोनाविषयी चुकीचे वक्‍तव्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होत असताना पडळकर यांनी जे वक्‍तव्य केले आहे, त्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष सूरज वाजगे, राहुल गावडे, शेखर शेटे, प्रणव संते आदींनी निवेदन देऊन केली आहे.