शेतकरी विधेयक रद्दच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने ; शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्दची मागणी

बारामती :संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्यावतीने बारामती येथे प्रशासकीय भवनासमोर शेतकरी विरोधी कृषी विधेयक कायदे रद्द करावे व दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही थांबवावी, या मागणीसाठी दगडाला पुष्पहार घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्यावतीने उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बारामती येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, शेतीमाल विक्री कायदा २०२० बऱ्याच कालावधीपासून शेतकरी त्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळावी ,म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा म्हणत असताना शेतीमाल विक्री कायदा लागू करून कृषी उत्पन्न बाजार समीतीचे खच्चीकरण केले आहे. भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याचा घाट घातला आहे .त्यामुळे तो थांबविण्यात यावा व शेतकरी विरोधी शेतीमाल विक्री कायदा २०२०, कंञाटी शेती कायदा २०२०, अत्यावश्यक वस्तू कायदा हे कायदे रद्द करावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही तात्काळ थांबवावी, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व आगामी काळात प्रस्तावित असलेले शेतकरी विजबिल विधेयक पुढे रेटणे थांबवावे ,अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा सचिव विनोद जगताप, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल काळकुटे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, उपाध्यक्ष योगेश जगताप, इंदापूर तालुका अध्यक्ष मकरंद जगताप, बारामती तालुका सचिव सोमनाथ जाधव, कार्याध्यक्ष मयुर जाधव, इंदापूर तालुका सचिव शुभम चव्हाण, भवानीनगर अध्यक्ष बबन पवार, उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड बारामती तालुका उद्योजक कक्ष अजित चव्हाण, दत्तात्रय जाधव, राहुल मोरे, सोमनाथ भोसले, अभिजीत जाधव इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.