प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणा-या स्पा सेंटरवर छापा टाकला. याप्रकरणी स्पा सेंटर चालक महिला व मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच पीडित मुलींची सुटका केली.

पिंपरी: पिंपरी चिंचवड़ पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने निगडीतील इन्सपिरिया मॉलमध्ये अमारा स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणा-या स्पा सेंटरवर छापा टाकला. याप्रकरणी स्पा सेंटर चालक महिला व मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच पीडित मुलींची सुटका केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागआला निगडीतील इन्सपिरिया मॉलमध्ये अमारा स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. याबाबत पथकाने बनावट गि-हाईक पाठवून खात्री केली खात्री पटल्यानंतर पथकाने सोमवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान स्पा सेंटरवर छापा टाकला. याप्रकरणी स्पा सेंटरची पन्नास वर्षीय चालक महिला व मॅनेजर शान मेहमुद खान (वय ३६, रा. प्राधिकरण, पुणे) यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथून पाच पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून आरोपींकडून ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.