राखीव निधी दिव्यांगाच्या बँक खात्यावर जमा करा

वाघोली ग्रामपंचायतीकडे दिव्यांग बांधवांची मागणी
वाघोली : दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी वस्तू किंवा उपाययोजनांवर खर्च न करता दिव्यांगांच्या बँक खात्यावर जमा करावा अशी मागणी वाघोलीतील दिव्यांग बांधवांच्यावतीने करण्यात आली आहे. राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांचे याबाबतचे पत्र दिव्यांग बांधवांनी वाघोली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांच्याकडे दिले आहे.

आ. बच्चू कडू यांच्या पत्रात म्हंटले आहे की, कोविड-१९ प्रादुर्भावाच्या काळामध्ये संपूर्ण देशात तसेच राज्यात करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे रोजगार बंद पडल्यामुळे दिव्यांग बांधवांची आर्थीकस्थिती अत्यंत हलाकिची झाली असून त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना दिलासा देणेस्तव ग्रामपंचायत तर्फे वाटप करण्यात येणारा ५ टक्के दिव्यांग निधीमधुन वस्तू स्वरुपात किंवा इतर कुठल्याही उपाययोजनावर खर्च न करता संपूर्ण ५% दिव्यांग निधी हा दिव्यांग बांधवांच्या बँकखात्यावर जमा करण्यात यावे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या काळामध्ये दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या घरपट्टी व पाणीपट्टी देयकांमध्ये ५० टक्के सवलत देण्याबाबतचे निर्देश दिलेले आहे.