पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान करोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू आहे. नुकतेच त्यांच्यात ज्येष्ठ मुलीचे आणि तरुण मुलाचे करोनाने निधन झाले आहे

मुंबई : पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे  (former Pune Mayor Datta Ekbote) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दु:ख व्यक्त केलं असून समाजवादी विचारांवर निष्ठा ठेवून वंचित, उपेक्षित, कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करणारं नेतृत्वं आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. पुण्याच्या जडणघडणीतील त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.