कुंभमेळ्यात घडले ते आषाढी वारीत घडायला नको म्हणून फक्त मानाच्या पालख्यांनाच परवानगी – अजित पवार यांचे स्पष्टीकरण

कुंभमेळ्यात(Kumbhmela) जे घडले, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये आषाढी वारीसाठी(Ashadhi Wari) फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्थीही घालण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

  बारामती : कोरोना(Corona) काळात कुंभमेळ्यात(Kumbhmela) जे घडले, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये आषाढी वारीसाठी(Ashadhi Wari) फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्थीही घालण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

  ते म्हणाले की, वारकरी, पोलीस, प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि इतरांशी चर्चा करूनच राज्य सरकारने वारीबाबतचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली वारीची परंपरा टिकली पाहिजे. परंतु, सध्या कोरोनाचे सावटही आहे, त्यांचा विचारही केला पाहिजे. त्यामुळे वारीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या पारंपारीक विधींसाठी शिथिलता देण्यात आली आहे, असेही पवार म्हणाले.

  मागील वर्षीचे निर्बंध आता नाहीत
  पवार म्हणाले की, मागील वर्षी वारीला जे निर्बंध घालण्यात आले होते. तसेच निर्बंध आता लावण्यात आलेले नाहीत. त्यासाठी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे.  ते म्हणाले की, आम्ही वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर करतो मात्र आरोग्याच्या हिताकडेही लक्ष दिले पाहिजे. तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शक्यतांचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. मात्र, वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र असतील तर त्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचना देऊन संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्यास सांगू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  दहा मानांच्या पालख्यांना वारीसाठी २० बसेस
  या दहाही मानांच्या पालख्यांना वारीला जाण्यासाठी २० बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर शंभर जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली.

  या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे. या मानाच्या पालख्यांमध्ये, संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपान काका महाराज (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर ), संत चांगाटेश्वर महाराज (सासवड)