Deputy Chief Minister Ajit Pawar's son Partha Pawar may get candidature in Pandharpur by-election

स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोरदार टीका केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही पवार यांनी अद्याप लोणकर कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. त्यांना स्वप्निलशी काही घेणेदेणे नाही, त्यांना त्यांचा मुलगा पार्थची काळजी आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का? याची चिंता त्यांना सतावत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

    दौंड : स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोरदार टीका केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही पवार यांनी अद्याप लोणकर कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. त्यांना स्वप्निलशी काही घेणेदेणे नाही, त्यांना त्यांचा मुलगा पार्थची काळजी आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का? याची चिंता त्यांना सतावत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

    लोणकर कुटुंबीयांची घेतली भेट

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरकारी नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला. स्वप्नीलचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. स्वप्निलच्या मृत्यूमुळे लोणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार पडळकर यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे स्वप्निलच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.

    सरकारची अनास्थाच कारणीभूत

    स्वप्नीलच्या मृत्यूला सरकारची अनास्थाच कारणीभूत असल्याचा आरोप पडळकरांनी केला. भाजपा नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, अशी मागणी विधानसभा अधिवेशनावेळी सभागृहात केली होती. अधिवेशन होऊन गेले, मात्र अजून सरकारकडून स्वप्निलच्या घरच्यांना ठोस मदत मिळालेली नाही. सरकार नुसत्या बैठका घेणार असेल तर मी या सरकारचा निषेध करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचा प्रतिनिधी पाठवून लोणकर कुटुंबीयांची भेट घेणे गरजेचे होते. मात्र अद्याप तसे घडलेले नाही, अशा शब्दांत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला आहे.