उपमुख्यमंत्री यांचा जुन्नर दौरा चक्रीवादळाने नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी

नारायणगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दि ०५ जून ला जुन्नर तालुक्यातील निसर्ग चक्री वादळ व पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व जिल्हाधिकारी यांना तातडीने

नारायणगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दि ०५ जून ला जुन्नर तालुक्यातील निसर्ग चक्री वादळ व पावसामुळे  नुकसान झालेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व जिल्हाधिकारी यांना तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश दिले . 

          
या दौऱ्यात खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके ,जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी, तहसीलदार हनमंत कोळेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना, सभापती संजय काळे ,पंचायत समिती सभापती विशाल तांबे,जिल्हा कृषी आधिकारी कृषी अधिकारी सतीश शिरसाठ ,सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे ,विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष सत्यशील शेरकर ,जि प सदस्य पांडुरंग पवार ,शरद लेंडे ,अंकुश आमले आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते . या दौऱ्यात सावरगाव, येणेंरे, पारुंडे ,बेलसर ढगडवाडी  या भागाचा दौरा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसान झालेल्या आंबा, केळी, पपई, ऊस, बाजरी, टोमॅटो,डाळिंब,कांदा भाजीपाला आदी पिकाच्या नुकसानी बाबत विचारणा केली . सावरगाव येथील शरद महाबरे  ,येणेरे येथील म्हातारबा ढोले  व ठाकरवाडी येथील बाळू भालेकर यांच्यापडलेल्या घरकुलाची  पाहणी केली . त्याचबरोबर विठ्ठलवाडी व ढगदवाडी  वादळाने पडझड झालेल्या घरांची देखील पाहणी केली. त्यावर जुन्नर येथे चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्या अजय साळुंखे यांच्या कुटुंबीयांना भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
 
जुन्नर तालुक्यात निसर्ग वादळी पावसाने ५ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रातील २२ हजार ९६० शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुमारे ४० कोटीचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने केला आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली .