If not, leave the post of Guardian Minister; Chandrakant Patil's advice to Ajit Pawar

अजित पवार यांनी माझी चेष्ठा करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की 54 जणांची यादी पवार साहेबांच्या ड्रॉव्हरमधून चोरून भाजपाकडे देणे हे महाराष्ट्राच्या नैतिकतेत बसत का? आणि तुम्ही मला शहाणपणा शिकवता, अशी सणसणीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. तसेच, मी झोपत सरकार पडेल असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया दिली म्हणून वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून मी ते करेल, असेही पाटील म्हणाले.

    पुणे : अजित पवार यांनी माझी चेष्ठा करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की 54 जणांची यादी पवार साहेबांच्या ड्रॉव्हरमधून चोरून भाजपाकडे देणे हे महाराष्ट्राच्या नैतिकतेत बसत का? आणि तुम्ही मला शहाणपणा शिकवता, अशी सणसणीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. तसेच, मी झोपत सरकार पडेल असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया दिली म्हणून वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून मी ते करेल, असेही पाटील म्हणाले.

    पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमावरून अजित पवारांवर निशाणा साधला. या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जात राष्ट्रवादीचे गटनेते असलेल्या अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. माझ्याकडे आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र आहे, असे अजित पवारांनी तेव्हा आम्हाला सांगितल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येतो. याच मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे. अजित दादांनी माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यात दांभिकपणा आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

    54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र बाहेर कसे आले, असे पाटील म्हणाले होते. या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले, जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले आहेत. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता कोरोनाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र काही जण काहीही स्टेटमेंट करत आहेत. टिकवता आले नाही असे म्हणत आहेत. हेच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं असतं, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता. आम्हीच असे केले होते, तसे केले होते. असले धंदे आहेत, त्यामुळे याचा मला राग येतो, अशी संतप्त टीका अजित पवारांनी केली.