देशमुख यांची चाैकशी आता सहकार विभागातील अधिकाऱ्याकडून

पुणे : पुणे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या कार्यकाळातील कारभारासह त्यांच्या नियुक्तीच्या चौकशीची जबाबदारी आता सहकार आयुक्तांकडे सोपविली आहे. पणन संचालक कार्यालयही चौकशीच्या कक्षेत येत असल्याने पणन संचालकांऐवजी सहकार आयुक्तांमार्पâत चौकशी करण्याचा निर्णय सहकार व पणनमंत्री जयंत पाटील यांनी घेतला असून, तसे आदेश सहकार आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश म्हस्के, सुरेश घुले आदी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन बी. जे. देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी करीत काही पुरावे सादर केले होते. त्याबरोबर देशमुख यांची सेवानिवृत्तीनंतर वंâत्राटी पद्धतीने केलेली नियुक्ती बेकायदा असल्याचा आरोपही केला होता. याप्रकरणी सहकार व पणन मंत्र्यांनी पणन संचालकांना चौकशीचे आदेश दिले होते.

यापूर्वी देशमुख यांच्या झालेल्या चौकशा पणन संचालकांनी दाबल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता, तर नियम १२ (१) नुसार परवानगी देताना तत्कालीन पणन संचालकांवरदेखील भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे पणन विभागामार्पâत होणारी चौकशी पुन्हा दाबण्याचा अथवा चौकशीला न्याय मिळणार नाही. त्यामुळे ही चौकशी सहकार आयुक्तांमार्पâत करावी, अशी मागणी या नेत्यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार जयंत पाटील यांनी देशमुख यांची तत्काळ चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्तांना दिले आहेत.

पणन संचालक सोनी वादात
पणन संचालक सतीश सोनी यांना मंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, सोनी यांनी शिरूर आणि हवेली तालुक्यातील सहायक निबंधकांना चौकशीसाठी नेमले होते. हा मुद्दा वादाचा ठरला. या चौकशीत पणन संचालक सोनी यांच्यावर संशय व्यक्त केला गेला. मंत्र्यांकडेही सोनी यांच्याबद्दल तक्रार झाली. जिल्हा सहकार उपनिबंधकांनी चौकशीसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, याची सुनावणी घेणे आवश्यक असल्याचे पत्र पणन संचालकांना दिले असताना त्याकडे दुर्लक्ष करून सोनी यांनी नेमलेल्या दोन कनिष्ठ अधिकाNयांच्या चौकशी समितीला यामुळे गाशा गुंडाळावा लागला आहे.