कर्जत तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाती आलेल्या पिकांची नासाडी

कर्जत : कर्जत तालुक्यातील चार मंडलात अतिवृष्टी झाली आहे या पावसाने पिकांची नासाडी झाली असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विष्णू देमुंडे यांनी केली आहे.
शहरासह तालुक्यातील साह मंडलातील अनेक ठिकाणी शनिवारी रात्री १०.३० वा. सुरू झालेला पाऊस सकाळी ६ वा. पर्यंत होता. रात्री पासून
जोरदार पाऊस कोसळला . विजेचा कडकडाट इतका प्रचंड होता , की अवघे शहर दुमदुमून जात होते , काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते . गेले दोन दिवस उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला होता. दिवसभर उष्मा वाढत आहे . शनिवारी सकाळी धुके पडले होते . त्यानंतर उन्हाचा कडाका सुरू झाला . कर्जत zचे कमाल तापमान ३० डिग्रीच्या वर पोहोचल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या . त्यामुळे सायंकाळी पाऊस दणकणार हे निश्चित होते . संध्याकाळी ६ वाजल्यापासून मेघगर्जना सुरू झाल्या आणि रात्री १०.३० ला सुरुवात झाली . पूर्वेकडून पाऊस सुरू झाला .साधारणतः रात्री १२ ते ३ वाजता शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली . विजेचा कडकडाट इतका प्रचंड होता , की वीज अंगावर पडते की काय , असे वाटत होते . मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले . शहरात एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने व रात्री अचानक वीज बंद झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता सतत विजेचा गडगडाट होत असल्याने भीतीही वाटत होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली . बंगालची खाडी व अंदमान निकोबारमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस होत आहे . उद्या , मंगळावरपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे .तर कर्जत तालुक्यातील साहित्य मंडलात झालेला पाऊस पुढील प्रमाणे झाला असून चार मंडलात अतिवृष्टी झाली आहे.
मंडल झालेला पाऊस आजअखेर एकुण पाऊस

कर्जत ९८ mm ७६५ mm
माहीजळगाव ६५ mm ६९५ mm
कोंभळी ५ mm ६०९ mm
राशीन १३२ mm ८३७ mm
भांबोरा ६७ mm ६६२ mm
मिरजगांव २३ mm ७०५mm

-हा पाऊस तारक व मारकही

हा पाऊस उशिरा पक्व होणाऱ्या व बागायती जमीनीला मारक ठरत आहे . जोरदार पावसाने ऊस आडवे पडले आहेत . मात्र उसासह रब्बी हंगामासाठी हा पाऊस तारक ठरणार आहे .

-१० वर्षानी वाहिल्या कर्जतच्या नद्या दुथडी भरून वाहिल्या 
कर्जत शहरातील कानोळा व लेंडी नदीला तब्बल २ ऑकटोबर २००९ नंतर म्हणजे तब्बल १० वर्षांनी या नद्या वाहिल्या आहेत. त्यामुळे पाणी पाहण्यासाठी तरूण व लहान मुलांची गर्दी झाली होती.