देऊळगाव- गाडाचे तलाठी यांच्या बेकायदेशीर कामाची चौकशीची मागणी

दौंड : दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडाचे तलाठी मनीषा कदम यांच्या बेकायदेशीर कामांची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार (ता.१७) रोजी दौंड तहसीलदार यांच्याकडे केली आहे, 

यावेळी दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडाचे तलाठी मनीषा कदम यांचे कामकाजाबाबत ग्रामस्थ व महसूल खात्यात खातेदार महसूल खातेदार शेतकरी यांच्या तक्रारी येत होत्या, गावकामगार तलाठी मनीषा कदम वेळेवर तलाठी कार्यालयात हजर राहत नाहीत,  सामान्य लोकांबरोबर उद्धट वर्तन करणे, सर्व-सामान्य लोकांची कामे करून करून देण्यासाठी पैशाची मागणी करत आहेत, तसेच संबंधित शेतकरी खातेदार यांची कामे पूर्ण करण्यास जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात आहेत, तलाठी महिला असल्याचा गैरफायदा घेऊन सरकारी कामात अडथळा केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी नागरिकांना देणे, अशा अनेक तक्रारी निवेदनात करण्यात आल्या आहेत, यावेळी जिल्हा शिवसेना विभाग उप प्रमुख महेश पासलकर व दौंड विभाग प्रमुख विजयसिंह चव्हाण उपस्थिती होते

सदर प्रकरणी संबंधित काही कामगार तलाठी यांची कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक आणि शिस्त व अपील नियम १९७९, शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंधक अधिनियम २००५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्या करण्यात आली आहे,

 

“देऊळगाव गाडा येथील तलाठी यांची खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल. “

– संजय पाटील (तहसीलदार, दौंड)