मोशीतील सफारी पार्क एमटीडीसी मार्फत विकसित करा महेश लांडगे यांची –  मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र विकसित करण्याबाबत राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. त्याला लवकर गती देऊन सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र एमटीडीसी कडून विकसित करावे, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी: पिंपरी चिंचवड़ मधील मोशी येथे १४० हेक्टर ६२ आर एवढ्या क्षेत्रावर सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र विकसित करण्याबाबत राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. त्याला लवकर गती देऊन सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र एमटीडीसी कडून विकसित करावे, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

आमदार लांडगे यांनी याबाबत राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्या म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील सफारी पार्क, मनोरंजन केंद्र एमटीडीसी कडून विकसित करण्यात येणार आहे. त्याबाबत  सप्टेंबर २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक देखील घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात मोशी येथील १४० हेक्टर ६२ आर एवढे क्षेत्र सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्रासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यातील ४४ हेक्टर ७२ आर एवढ्या क्षेत्रात सफारी पार्क तर ९५ हेक्टर ९० आर एवढ्या क्षेत्रात मनोरंजन पार्क उभारण्यात येणार आहे. सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या विकासनाबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मिळाला. तसेच या दोन्ही आरक्षणाचे तातडीने विकसन करावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.