ग्रामविकास अधिकारी नसल्याने विकासकामे ठप्प

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीला गेल्या दोन वर्षापासुन कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळत नसल्यामुळे विकास कामे ठप्प झाली आहेत. गावातील अत्यावश्यक सेवा,कचरा गाडी,स्टड्ढीट लाईट,कामगारांचे पगार अशा दैनंदिन गोष्टींना त्यामुळे खीळ बसली आहे.कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी नियुक्त करावा.अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीतील प्रकार

मंचर  : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीला गेल्या दोन वर्षापासुन कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळत नसल्यामुळे विकास कामे ठप्प झाली आहेत. गावातील अत्यावश्यक सेवा,कचरा गाडी,स्टड्ढीट लाईट,कामगारांचे पगार अशा दैनंदिन गोष्टींना त्यामुळे खीळ बसली आहे.कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी नियुक्त करावा.अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अवसरी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीस सक्षम ग्रामविकास अधिकारी तालुका प्रशासनाकडून मिळत नाही.अनेक दिवसांपासून तालुका प्रशासन आणि ग्रामसेवक यांच्यात समन्वय नसल्याने गावच्या विकास कामांना व नागरिकांच्या मूलभूत गरजांना खीळ बसली आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे पगार काही महिने थकले आहेत. तालुका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी महेमुद चौगुले यांची    बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी दुसरे ग्रामविकास अधिकारी आले होते. मात्र त्यांनी पदभार घेतल्यानंतर आजारपणाच्या दिर्घ सुट्टीवर गेले.तालुका प्रशासनाने दुसऱ्या गावातील ग्रामसेवकांना तात्पुरता पदभार दिला. त्यांनी काही दिवसभर कामकाज पाहिले.त्यानंतर पुन्हा दुसऱ्या ग्रामसेवकाची नेमणूक झाली. मागील दोन महिन्यापासून ग्रामसेवकांनी पदभार घेतला असून काही तांत्रिक अडचणीमुळे जेवढे निर्णय ग्रामसेवकांनी घ्यायला पाहिजे. तेवढे निर्णय होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. नागरिकांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन देताना ग्रामपंचायत आणि सदस्य तसेच नागरिकांना पदरमोड करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाय योजना करण्यासाठी नागरिकांना ग्रामपंचायतीतर्फे मोफत साबण वाटप करण्यात आले.त्याचे बिल रखडले असल्याची माहिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर यांना मानधन मिळाले नाही. साडेचार किलोमीटर अंतरावरुन घोडनदी येथून गावाला पाणीपुरवठा होत आहे. मात्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीच्या खर्चासाठी अडचण निर्माण होत आहे.