कुठेही काही घटना घडली की त्याचं नातं पुण्याशी जोडलं जातं. पुणे सगळ्या अर्थाने प्रगतीचं शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, पुण्यामध्ये सेटल झाले पाहिजे पण देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे असे पाटील म्हणाले.
पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात एक मोठी घोषणा केली. देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार अशी घोषणा त्यांनी केली. विशेष म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली आहे.
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यातद आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूर जाईन. हे मी माझ्या विरोधकांना सांगून टाकतो असं चंद्रकांत पाटील म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
पुण्यात अनेक नेते घडले आहेत.