दिवसा देवपूजा आणि रात्री घरफोड्या करणाऱ्यास अटक ; जेजुरी पोलिसांची कामगिरी

प्रकाश सिताराम सोनवणे ऊर्फ बुवा (वय ५४, रा. विरार फाटा नागेश्वर मंदिरजवळ ठाणे )याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीवर मुंबई,ठाणे, पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी सध्या जेजुरीत वास्तव्यास असून भजने म्हणत हिंडतो अशी माहिती ठाणे येथील पोलीस निरीक्षक सानप यांनी जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना कळवली त्यानुसार तपास केला असता कडेपठारच्या डोंगरात काल गणपूजा उत्सव असल्याने हा आरोपी कडेपठार रस्त्यावर एका घरामध्ये त्याच्या साथीदारांसह बसला असल्याची माहिती पोलीस हवालदार संदीप मोकाशी यांना मिळाली.

    जेजुरी : दिवसा साईबाबा व खंडोबाची भक्ती गीते सादर करून रात्रीच्या वेळी घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास जेजुरी पोलिसांनी सापळा रचून पकडले. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश सिताराम सोनवणे ऊर्फ बुवा (वय ५४, रा. विरार फाटा नागेश्वर मंदिरजवळ ठाणे )याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीवर मुंबई,ठाणे, पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी सध्या जेजुरीत वास्तव्यास असून भजने म्हणत हिंडतो अशी माहिती ठाणे येथील पोलीस निरीक्षक सानप यांनी जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना कळवली त्यानुसार तपास केला असता कडेपठारच्या डोंगरात काल गणपूजा उत्सव असल्याने हा आरोपी कडेपठार रस्त्यावर एका घरामध्ये त्याच्या साथीदारांसह बसला असल्याची माहिती पोलीस हवालदार संदीप मोकाशी यांना मिळाली.

    पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर पोलिस कर्मचारी संदीप कारंडे, धर्मवीर खांडे यांनी सापळा रचून आरोपीला पकडले या आरोपीने जेजुरी परिसरात काही गुन्हे केले आहेत का याची माहिती घेतली जात आहे. जेजुरी परिसरामध्ये कोणाला वास्तव्यास ठेवताना घर व लॉज मालकांनी पूर्ण कागदपत्रे पाहूनच मुक्काम करून द्यावा,अशी सूचना जेजुरी पोलिसांनी केली आहे. या आरोपीला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.