पारगांव येथील ढाबाचालक कोरोनाबाधित

मंचर  :  आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगांव येथे (वय २७) वर्षीय ढाबाचालक कोरोनाबाधित सापडला आहे. गावातील कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या ९ झाली असून २ रुग्ण बरे झाले आहेत. सात जणांवर उपचार सुरु आहेत. पारगांव येथे एका २७ वर्षीय ढाबा व्यवसायिकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून गावातील इतर ३८ व्यक्तींंची कोरोना तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ३७ व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. कोरोनाबाधित ढाबा व्यवसायिक व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींंना तसेच ढाब्यावर काम करणाऱ्या व्यक्तीना  विलगीकरण करण्यात आलेले आहे. सदर  कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींंची माहिती ग्रांमपंचायत प्रशासन घेत आहेत,अशी माहिती ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजणे यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यापासुन पारगांव सील करण्यात आले आहे. मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे,पोलिस जवान सागर गायकवाड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे आदिंनी गावाला भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने गावामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.