The coroner's rule at the royal wedding of the former MP's royal son; Photo session without wearing the mask of a leader

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यात पार पडला. महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांची ऐशीतैशी झाली. या लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या नेते मंडळींचे मास्क न लावता फोटोसेशन केले. एकीकडे सर्वसामान्यांवर बंधने घातली जात असताना शाही विवाह सोहळे आयोजीत करणाऱ्या राजकारण्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर सर्वांसाठी नियम सारखा असून कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि लॉन्सचे मॅनेजर निरुपल केदार या तिघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  पुणे : माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यात पार पडला. महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांची ऐशीतैशी झाली. या लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या नेते मंडळींचे मास्क न लावता फोटोसेशन केले. एकीकडे सर्वसामान्यांवर बंधने घातली जात असताना शाही विवाह सोहळे आयोजीत करणाऱ्या राजकारण्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर सर्वांसाठी नियम सारखा असून कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि लॉन्सचे मॅनेजर निरुपल केदार या तिघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  पुण्यातल्या हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स याठिकाणी धनंजय महाडिक यांचा मुलगा पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी देशमुख यांचा विवाह सोहळा रविवारी संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, संजय राऊत, शरद पवार अशा अनेक दिग्गज नेतेमंडळींनी या सोहळ्याला हजेरी लावली.
  हा लग्न सोहळा सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी जनतेला संबधीत करताना गर्दी करणे टाळा अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा दिला. मात्र, थेट राजकारण्यांकडून हे सगळे नियम धाब्यावर बसवले गेल्याचे या लग्न सोहळ्यात पहायला मिळाले.

  या लग्नाला दोनशेहून अधिक लोकांनी हजेरी लावली. यासह सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवले गेले. लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांनी स्टेजवर जातानाही मास्क घातलेला नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगदेखील पाळलं नव्हतं.
  तर, काही लोकांनी मास्क हनुवटीवर घेत फोटोसाठी पोज दिली. याला वधू वरांसोबत धनंजय महाडिकदेखील अपवाद ठरले नाहीत.
  दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यामध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली असताना हा प्रकार पहायला मिळाल्याने महाडिक यांच्यावर कारावाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

  यावरून लॉन्स चालकाला नोटीस बजावण्यात आली होती. आता याच प्रकरणी धनंजय महाडिक यांच्यासह तीन जणांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी लॉन्सच्या मालक आणि मॅनेजर विरोधातही गुन्हा दाखल दरम्यान, कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि लॉन्सचे मॅनेजर निरुपल केदार या तिघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

  राष्ट्रीय आपत्कालीन प्रशासन अधिनियम २००५ कलम ५१ आणि महाराष्ट्र कोव्हिड धोरण योजना २०२० च्या कलम ११ अंतर्गत आयपीसी १८८, २६९, २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.