धनगर समाज आक्रमक, राज्यभरात करणार आंदोलन

भिगवण :धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत झाले आहे. भिगवण (ता इंदापुर) येथे झालेल्या राज्यव्यापी धनगर आरक्षण एल्गार सभेत संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. या सभेची सांगता राज्यमंत्री मंडळाची यादी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रमाने दिलेल्या २२ सवलतींचा अध्यादेश जाळण्यात आला. भिगवण येथील सभेचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, आबा बंडगर, अनिल तांबे, नाना बंडगर, महेश शेंडगे, वैभव देवकाते, प्रदीप वाकसे, अतुल देवकाते आदींनी केले होते. तर डॉ शशिकांत तरंगे सभेचे निमंत्रक होते. सभेला संपूर्ण राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. धनगर समाज एका झेंड्याखाली आणण्यासाठी इंदापूर तालुक्यातील युवकांनी पुढाकार घेतला असुन एकच झेंडा आणि एकच दांडा या उक्तीप्रमाणे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी सरकारला जाग आणण्यासाठी सर्व पक्षीय समाज एका छताखाली येऊन आंदोलन करणार असल्याचे डॉ शशिकांत तरंगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.सभेला माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी आमदार रामराव वडकुते, भाजपा प्रवक्ते गणेश हक्के, मदनराव देवकाते, सुरेश कांबळे, अर्जुन सलगर, चंद्रकांत देशमुख, भुषणसिंह होळकर, अक्षय शिंदे, किशोर मासाळ आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वानुमते राज्यभरात एका वेळी एकच आंदोलन करण्याचे ठरल्याने शासनाला आंदोलनाची दखल घ्यावी लागेल,अन्यथा भविष्यात रस्त्यावरील तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी धनगर नेत्यांनी दिला.