धानोरे शालेय समितीच्या अध्यक्षास मारहाण

शिक्रापूर : धानोरे (ता. शिरूर) येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षास शाळेत पत्त्या खेळू नका म्हटल्याच्या रागातून तिघांनी बेदम मारहाण केली असल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

 शाळेत पत्त्या खेळू न दिल्याच्या रागातून मारहाण

शिक्रापूर : धानोरे (ता. शिरूर) येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षास शाळेत पत्त्या खेळू नका म्हटल्याच्या रागातून तिघांनी बेदम मारहाण केली असल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
धानोरे ता. शिरूर येथील येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळा बंद असताना काही नागरिक पत्त्या खेळत असल्याबाबतची माहिती शालेय समितीच्या अध्यक्षांना देत त्यांना समज देण्याची विनंती गावातील व्यक्तीने केली.
-लाकडी दांडक्याने मारहाण
सदर शालेय समितीचे अध्यक्ष निलेश उर्फ संदीप चकोर यांनी पत्त्या खेळणाऱ्या युवकांना तुम्ही शाळेमध्ये पत्त्या खेळू नका, एकत्र बसू नका अशी सूचना दिली होती. त्यावेळी तेथे असलेल्या निलेश भोसुरे याने चकोर यांच्याशी बाचाबाची केली व त्याचा राग पत्त्या खेळणाऱ्या युवकांच्या मनात आला. त्यांनतर चकोर हे शेतातील मोटार चालू करून घरी येत असताना अचानक निलेश भोसुरे, प्रदीप भोसुरे व अक्षय भोसुरे हे देखील हातामध्ये लोखंडी रॉड, गज, लाकडी दांडके घेऊन तेथे आले आणि चकोर यांना तुला लई माज आला का, शाळा तुझ्या बापाची आहे का असे म्हणत लोखंडी रॉड, गज व लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी करून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे.याबाबत धानोरे जिल्हा परिषद शाळेचे शालेय समिती अध्यक्ष निलेश उर्फ संदीप जयसिंग चकोर रा. धानोरे ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी निलेश दत्तात्रय भोसुरे, प्रदीप बापू भोसुरे व अक्षय सतीश भोसुरे सर्व रा. धानोरे ता. शिरूर जि पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.