crime scene

दोन मित्रांना तीन चोरट्यांनी लुबाडले. मोशी टोल नाक्याजवळ रात्री साडे अकराच्या सुमारास जबरी चोरीचा हा प्रकार घडला. विनोद चंद्रकांत बिरादार (वय ३२, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

    पिंपरी: शहरात मोबाईल चोरीच्या घटना सुरूच आहेत. चोरटे नागरिकांच्या हातातून मोबाईल हिसकावून धूम ठोकतात. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी १४ गुन्हे दाखल झाले. त्यापाठोपाठ रविवारी देखील तीन गुन्हे दाखल झाले. त्यामुळे मोबाईलधारक धास्तावले आहेत.

    सागर भागवत बोरले (वय ३३, रा. देहू फाटा, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोरले हे कंपनीच्या पिकअप पॉइंटवर बसची वाट पाहत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बोरले यांच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. देहू फाटा – आळंदी येथे १४ मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय मोहन धावणे (वय २७, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धावणे हे त्यांच्या मित्राला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते रस्त्यावर थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील पाच हजार रुपयांचा मोबाईल हिसका मारून नेला.

    maha

    तीन चोरट्यांनी दोघा मित्रांना लुटले

    दोन मित्रांना तीन चोरट्यांनी लुबाडले. मोशी टोल नाक्याजवळ रात्री साडे अकराच्या सुमारास जबरी चोरीचा हा प्रकार घडला. विनोद चंद्रकांत बिरादार (वय ३२, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांचा मित्र हे मोशी टोल नाक्याजवळ थांबले असताना रिक्षातून तीन अनोळखी चोरटे आले. फिर्यादी बिरादार व त्यांच्या मित्राला चोरट्यांनी धमकी देऊन त्यांच्याकडील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर फिर्यादीला २५० रुपये तर फिर्यादीच्या मित्राला ३ हजार ५०० रुपये एका मोबाईल क्रमांकावर जबरदस्तीने पाठविण्यास सांगितले. असा १८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लुबाडून चोरटे पळून गेले.