रोटरी क्लब ऑफ कुरकुंभच्या अध्यक्षपदी फुलचंद ढोरे

कुरकुंभ: दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील २०२०-२०२१ या वर्षीच्या रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एम आयडीसी ३१३१ च्या अध्यक्ष पदी फुलचंद ढोरे यांची तर सेक्रेटरी पदी मनीष अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली.

रोटरी क्लब दर एक वर्षी प्रमाणे अध्यक्ष पदाची फेररचना करण्यात येते, २०१९-२०२० या वर्षीच्या महेश भागवत यांचा कार्यकाळ जून महिन्यामध्ये संपला असल्याने चालू वर्षीच्या अध्यक्ष पदी फुलचंद ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाइन व्हिडिओ कॉल च्या साहायाने कुरकुंभ रोटरी  क्लबच्या अध्यक्ष पदाची आणि सेक्रेटरी पद जाहिर करण्यात आले, यावेळी फुलचंद ढोरे यांनी मागील वर्षात अनेक सार्वजनिक, विविध कामे रोटरी क्लब च्या माध्यमातून केली असून चालू वर्षी नव-नविन कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले. यामध्ये रक्तदान शिबिर,झाडे लावणे, गरीब आरोग्य शिबिर व गरजू विद्यार्थांना शालेय वास्तुचे वाटप करणे, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत असे अनेक विविध कार्यक्रम  घेणार असल्याचे सांगितले.