चक्क मृत व्यक्ती घेऊन गेला रेशनिंग धान्य ?  रेशन दुकानदाराचा काळाबाजार उघड

यवत : दौंड तालुक्यातील यवत येथे मयत व्यक्तीच्या नावे धान्य काढून विकल्याचा धक्कादायक प्रकार यवत येथील सौ टी. के. तांबोळी या स्वस्त धान्य दुकानाचा प्रकार समोर आला असून याबाबत तक्रारदार बबन दोरगे यांनी गावकामगार तलाठी कैलास भाटे यांच्याकडे तक्रार केली आहे.

 यवत :   दौंड तालुक्यातील यवत येथे मयत व्यक्तीच्या नावे धान्य काढून विकल्याचा धक्कादायक प्रकार यवत येथील सौ टी. के. तांबोळी या स्वस्त धान्य दुकानाचा प्रकार समोर आला असून याबाबत तक्रारदार बबन दोरगे यांनी गावकामगार तलाठी कैलास भाटे यांच्याकडे तक्रार केली आहे.

   यवत येथील बबन दोरगे (रा.यवत) चालू महिन्यांचे धान्य घेण्यासाठी रास्त दुकानदार सौ टी. के. तांबोळी गेले असता संबंधित दुकान चालक यांनी रेशनकार्ड बंद असल्याचे करण देत धान्य देण्यास नकार दिला, पण याबाबत दोरगे यांनी नातेवाईक यांना सांगितले असता संबंधितांनी दोरगे यांचे ऑनलाईन तपासणी केली असता धान्य वाटप झाले असल्याची माहिती मिळाली. यावेळी बबन दोरगे यांच्या रेशनकार्डमध्ये त्यांची आई व बहीण असे एकूण तीन सदस्यांची नोंद आहे. पण बंद दोरगे यांची आई एक वर्षांपूर्वी मयत झाला होत्या. तसेच त्यांची बहीण यांचे ऑनलाईनला नाव येत नाही.
      अनेक कुटुंबधारक यांचे धान्य वाटपा वेळी मशीन अंगठ्याचे ठसे येत नसल्याने धान्य घेऊन जात नाही अश्या लोकांचे धान्य पुरवठा अधिकारी भालेराव स्वतःच्या अंगठ्याचे ठसे देऊन दुकानदार यांना संबंधितांना धान्य वाटप करण्यास सांगतात. पण स्वस्त दुकानदार यांनी पुरवठा अधिकारी भालेराव यांचे अंगठ्याचे ठसे घेऊन काढलेले संबंधित रेशन धारकांना धान्याचे वाटप न करता परस्पर काळाबाजार करत विक्री केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे शासनाची फसवणूक करण्याऱ्या स्वस्त धान्य दुकानदार यांचा परवाना रद्द करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
 
यवत येथील बबन दोरगे यांचे मशिनला ठसे येत नसल्याने धान्य वाटप करण्यास अडचणी येत होत्या. स्वस्त धान्य दुकानदार  सौ टी. के. तांबोळी यांनी याबाबत पुरवठा विभागाला कळविले या अनुषंगाने मी संबंधित रेशनधारक यांचे ठसे दिले. पण  सौ टी. के. तांबोळी यांनी धान्य वाटप केले नसल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार कडक कारवाई केली जाईल.
   गिरीश भालेराव, (पुरवठा निरीक्षक, दौंड)