सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग लावली की लागली? भाजप आमदाराने व्यक्त केला संशय

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागलेय. घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी या आगीमागे घातपाताची शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या या शंकेमुळे आगीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही लागली आहे.ज्या ठिकाणी आग लागली तिथं करोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत तरी कुठल्याही जिवीतहानीबद्दलची माहिती नाही. मी तातडीने घटनास्थळी रवाना होत आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.

दुपारी १ च्या सुमारास मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या आवारातील नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थींचे प्रयत्न सुरु आहेत.