डिंभे धरण ९४.४० टक्के भरले

मंचर : अंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबुगेनु सागर (डिंभे धरण) गुरुवार (दि.२७) रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत ९४.४०  टक्के भरले आहे.पावसाचा जोर राहिल्यास केव्हाही धरणाच्या सांडव्यावरुन पाणी सोडण्यात येईल,अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. पाऊस असाच सुरु राहिला तर येत्या काही दिवसांमध्ये (डिंभे धरण) हुतात्मा बाबु गेणु सागर पुर्ण भरेल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हुतात्मा बाबु गेणु सागर (डिंभे धरण) आंबेगाव, शिरुर,जुन्नर तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर,श्रीगोंदा,कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांना हुतात्मा बाबु गेणु सागर (डिंभे धरण)  येथील पाण्याचा फायदा होत असतो. त्यामुळे पाऊस असाच सुरु राहुन धरण लवकर भरावे, अशी अपेक्षा आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह जुन्नर, शिरुर, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. सध्या पश्चिम आदिवासी भागात सुरु असलेल्या पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून पावसामुळे परीसर फुलून गेलेला आहे. येथील शेतकरी निसर्ग पाहण्याचा आनंद घेत आहेत.