थेट अमेरिकेतून तो पत्नीला म्हणाला, ‘तलाक,तलाक,तलाक!’ ; पतीसह कुटुंबियाविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला तिच्या पतीने अमेरिकेतून तोंडी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच तिला तिच्या मुलाला सहा महिन्यांपासून भेटू दिले नाही. याबाबत पत्नीने पोलिसात धाव घेत पती, सासू, चुलते सासरे आणि नणंदेच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

देहूरोड पोलिसांनी पीड़ित पत्नी चा पती रफिक रजाक तांबोळी, सासू जमेलाबानू रजाक तांबोळी, चुलत सासरे सत्तरभाई महम्मद तांबोळी, नणंद समिना फरीद तांबोळी (सर्व रा. मेन बाजार देहूरोड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी पीडित विवाहितेचा सन २०१६ पासून २२ डिसेंबर २०२० या कालावधीत शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेच्या मुलाला सहा महिन्यांपासून भेटू दिले नाही. तसेच आरोपींनी थेट अमेरिकेतून इस्लामी कायद्यानुसार तोंडी तलाक दिला. विवाहितेने तिला नंदवण्यासाठी घेण्याची आरोपींना वारंवार विनंती केली. मात्र, आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.