Discharge of 3424 cusec water from Khadakwasla dam started Administration alert
खडकवासला धरणातून ३४२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

ऑक्टोबर (october) महिन्यात पुण्यात (pune) पावसाचा धुमाकूळ (heavy rainfall) सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा (city water supply) करणारी चारही धरणे (four dams) काठोकाठ भरलेली (full water stock) आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) आज सकाळी ठीक ८.०० वा. ३४२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग (Discharge of water) करण्यात येत आहे.

  • प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, पुणे :

ऑक्टोबर महिन्यात पुण्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरलेली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून आज सकाळी ठीक ८.०० वा. ३४२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पुढे तो परिस्थिती नुसार वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव ही चारही धरणे १०० टक्के भरलेली आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या २ वेळच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या चारही धरणाची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. पुणेकरांना महिन्याला साधारण सव्वा ते दीड टीएमसी पाणी लागते. वर्षाला पुणेकरांना सुमारे १८ टीएमसी पाणी लागते. धरणे भरलेली असल्याने शेतीलाही मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे उर्वरित पाणी सोडण्यात येत आहे. पुणेकरांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.