डिसले गुरुजी यांच्या तब्येतीची  उपसभापती  डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून विचारपूस

श्री डिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपसभापती कार्यालयाच्या वतीने दररोज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येत होती.

पुणे: ग्लोबल शिक्षक पुरस्कार मिळलेल्या सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले गुरुजी यांना कोरोनाची लागण मागील आठवड्यात झाली होती. मागील आठवड्यात श्री डिसले गुरुजी यांचा मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ मंत्री, विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सत्कार केला होता. श्री डिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपसभापती कार्यालयाच्या वतीने दररोज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येत होती. त्यांचे आज दि.१७ डिसेंबर, २०२० रोजी दूरध्वनीवरून डॉ.गोऱ्हे यांनी श्री डिसले यांची व त्यांच्या कुटुंबाची तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी जे कार्य केले आहे, त्यांचे देशाला मोठा फायदा होत आहे. त्यांची तब्येत लवकर चांगली होऊन कार्याला सुरवात करावी असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या.