दोन बिल्डर्सचा वाद; ऑफिस पेटवले

पुणे :  शहरातील बड्या भागीदारीत असलेल्या ईशा ग्रुप संस्थेच्या माजी संचालकाने आर्थिक वादातून ऑफिसची तोडफोड करत आग लावून दिली. यानंतर तेथेच आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला. धनकवडी भागात हा प्रकार घडला. दोन बिल्डर्सच्या वादाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हसमुख बाबूलाल जैन (रा. गुलटेकडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे :  शहरातील बड्या भागीदारीत असलेल्या ईशा ग्रुप संस्थेच्या माजी संचालकाने आर्थिक वादातून ऑफिसची तोडफोड करत आग लावून दिली. यानंतर तेथेच आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला. धनकवडी भागात हा प्रकार घडला. दोन बिल्डर्सच्या वादाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हसमुख बाबूलाल जैन (रा. गुलटेकडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भरत नागोरी (६१, ईशान्य सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शंकर महाराज मठाशेजारी गंगा ईशान्य इमारतीत कार्यालय आहे. दरम्यान, २००६ मध्ये हसमुख जैन, फिर्यादी व इतरांनी ईशा ग्रुप नावाने भागीदारीत संस्था स्थापन केली होती. त्यात नागोरी, जैन व स्वर्णसिंग सोहेल हे २०१४ पर्यंत संचालक होते. त्यानंतर जैन याने ईशा संस्थेच्या अंतर्गत असलेल्या ईशा स्ट्रक्‍चर्स लिमिटेड कंपनीचा राजीनामा दिला होता. मात्र, यानंतर या कंपनीच्या भागीदारांमध्ये न्यायालयात अनेक दावे सुरू आहेत. फिर्यादी व जैन यांच्यात आर्थिक व इतर गोष्टीसाठी वाद सुरू आहेत. दि २४ डिसेंबर रोजी दुपारी जैन हा फिर्यादी नागोरी यांच्या धनकवडी येथील कार्यालयामध्ये गेला. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत कार्यालयामधून बाहेर काढले. यानंतर आतून दरवाजे लावून घेत कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर त्याला आग लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे. यात कार्यालयाचे मोठ आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे