तालुक्‍यात ६००० किटचे वितरण

राजेगाव : दौंड तालुक्‍यात लॉकडाऊनच्या काळात हातवार पोट असलेल्यांना आमदार राहुल कुल यांच्या पुढाकारातून सुमारे ६ हजार अन्नधान्य कीटचे वितरण करण्यात आले आहे.

 राजेगाव :  दौंड तालुक्‍यात लॉकडाऊनच्या काळात हातवार पोट असलेल्यांना आमदार राहुल कुल यांच्या पुढाकारातून सुमारे ६ हजार अन्नधान्य कीटचे वितरण करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, करोनाचा सामना करत असताना संचारबंदीमुळे रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने गोरगरीब जनता, कष्टकरी, मजूर, हातावर पोट असलेल्या कामगारांचे अन्नधान्यावाचून हाल होऊन त्यांच्यासमोर प्रपंच चालविण्याचा मोठा प्रश्‍न उभा राहिला होता. अनेक कुटुंबांना रेशनिंग किंवा इतर कुठल्याही प्रकारे अन्नधान्याची मदत मिळत नव्हती, अशा गरजू नागरिकांना आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या सहकार्यांतूनही मदत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ६ हजारांहून अधिक कुटुंबाना १५ दिवस पुरेल अशा किराणा सामग्रीचे वाटप करण्यात आले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्‍यातील दौंड उपजिल्हा व यवत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्‍टर, नर्सेस व कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील तसेच खासगी डॉक्‍टर्स हे सर्व कर्मचारी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता तालुक्‍याच्या सेवेसाठी झटत आहेत. या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे या हेतूने त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक वस्तूंचे वाटप यापूर्वी आमदार कुल यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.