काळा बाजार केल्यास कडक कारवाई ; तालुका कृषी विभागाचा इशारा

कवठे येमाई : पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. खरीप हंगामातील नियोजनासाठी कृषी विभाग सज्ज झाले आहे. खरीप हंगाम २०२० च्या अनुषंगाने नुकतीच व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे तालुक्यातील सर्व कृषी

 कवठे येमाई  : पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. खरीप हंगामातील नियोजनासाठी कृषी विभाग सज्ज झाले आहे. खरीप हंगाम २०२० च्या अनुषंगाने नुकतीच व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्यांची आढावा बैठक घेण्यात आली.त्यामध्ये विक्रेत्यांना जादा दराने विक्री न करणे, साठा व भाव फलक लावणे, शेतकऱ्यांना विहीत नमुन्यातील पावती देणे, पॉज मशिन चा वापर करणे तसेच कोविड-१९ चे नियम पाळणे इ.सूचना  देण्यात आल्या आहेत. तर सदर सुचनांचे अमलबजावणी , पालन कसे होत आहे याची पाहणी व विक्री केंद्र तपासणी शिरुर तालुक्यातील मलठण व इतर परीसरात शिरूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी निलेश बुधवंत यांनी केली.

तपासणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या विक्रेत्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच पाबळ,मलठण व शिरूर येथून रासायनिक खतांचे, बियाणांचे व किटकनाशकाचे काही नमुने तपासणी साठी घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.