व्हॉट्सअपवर मेसेज करून दिला तलाक ; माहेरहून कुलर, इस्त्री आणत नसल्याने पतीचे कृत्य

तक्रारदार व साजिद यांचे २०१९ मध्ये विवाह झालेला आहे. त्यांना एक मुलगी आहे. साजिद हा मिळेल ते कामे करतो. दरम्यान, त्याने पत्नीला माहेरवरून कुलर, इस्त्री तसेच फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावे यासाठी सांगत असत. त्यावरून त्यांचा मानसिक व शारिरीक त्रास देण्यास सुरूवात केली. त्यांचा व मुलीचा सांभाळ न करण्याच्या उद्देशाने त्यांना या वस्तू आणण्यासाठी माहेरी पाठवून दिले.

    पुणे : कुलर, इस्त्री तसेच इतर साहित्य माहेरवरून न आणणाऱ्या पत्नीला व्हॉट्सअपवर मेसेजकरून बेकायदेशीर तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पती साजिद मगदुम शेख व सासू यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २८ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व साजिद यांचे २०१९ मध्ये विवाह झालेला आहे. त्यांना एक मुलगी आहे. साजिद हा मिळेल ते कामे करतो. दरम्यान, त्याने पत्नीला माहेरवरून कुलर, इस्त्री तसेच फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावे यासाठी सांगत असत. त्यावरून त्यांचा मानसिक व शारिरीक त्रास देण्यास सुरूवात केली. त्यांचा व मुलीचा सांभाळ न करण्याच्या उद्देशाने त्यांना या वस्तू आणण्यासाठी माहेरी पाठवून दिले. त्यांनी काहीच न आणल्यानंतर त्यांना व्हॉट्सअपवर तीन वेळा तलाक, तलाक असा मेसेजकरून त्यांना बेकायदेशीर तलाक दिला आहे. याबाबत तक्रारदार यांनी पोलीसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, पोलीसांनी अर्जाची चौकशी केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एच. बी. खोपडे हे करत आहेत.