पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची ओळख उघड करू नका; राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे पोलिसांना आदेश

राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने स्वत:हून (सु मोटो) घेतली. आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना एक आदेश काढला. त्यानुसार या दुर्दैवी मुलीची ओळख पटणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर त्याबाबतचा कार्यवाही अहवाल सात दिवसांत द्यावा असे आदेश देण्यात आले.

    पुणे: पुणे स्थानकावर १४ वर्षीय मुलीवर १३ जणांनी केलेल्या सामूहिक बलात्कार ( Pune gang rape case)प्रकरणात मुलीची ओळख पटणार नसल्याची खातरजमा करून त्याचा कार्यवाही अहवाल सात दिवसांत द्यावा, असे आदेश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने(National Child Rights Commission) पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

    पुण्यात ३१ ऑगस्ट रोजी एका १४ वर्षीय मुलीवर सलग दोन दिवस १३ जणांनी बलात्कार केला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. शहरातील अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

    मित्राला भेटण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या या मुलीला जाण्यासाठी पैसे देण्याच्या आमिषाने तिच्यावर १३ जणांनी बलात्कार केला होता. याप्रकरणी आलेल्या बातम्यांची दखल राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने स्वत:हून (सु मोटो) घेतली. आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना एक आदेश काढला. त्यानुसार या दुर्दैवी मुलीची ओळख पटणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर त्याबाबतचा कार्यवाही अहवाल सात दिवसांत द्यावा असे आदेश देण्यात आले.