महाविकास आघाडी तोडायची आहे का? राष्ट्रवादीच्या आमदाराचा थेट संजय राऊंतावर पलटवार

खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर असताना ज्यांचा मुख्यमंत्री त्यांचे सरकार असल्याचे म्हटले होते. त्याला पलटवार करताना सध्या राज्य उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे चालत असल्याचे सांगतत खेड आळंदीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंनी वादाला आणखी फोडणी दिली आहे.  

    पुणे : खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर असताना ज्यांचा मुख्यमंत्री त्यांचे सरकार असल्याचे म्हटले होते. त्याला पलटवार करताना सध्या राज्य उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे चालत असल्याचे सांगतत खेड आळंदीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंनी वादाला आणखी फोडणी दिली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागाच्या शिरूर लोकसभेत आले असतानाच स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना महाविकास आघाडी तोडायची आहे का? असा थेट सवाल केला आहे.

    महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र त्याच संजय राऊतांना महाविकास आघाडी तोडायची आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केला आहे. पुण्याच्या शिरूर लोकसभेत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद टोकाला गेल्याचे दिसत आहे.