मुलीला कुत्रा चावला म्हणून कुत्र्याच्या मालकाला अटक

पिंपरी : एका सात वर्षीय मुलीला पाळीव कुत्रा चावल्यानंतर या प्रकरणी कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी साडेसहा वाजता जयमाला नगर, जुनी सांगवी येथे घडला.

संजय विनायक पवार (रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रतीक्षा राजकुमार इंगोले (वय ७) असे जखमी मुलीचे नाव आहे. ज्योत्स्ना राजकुमार इंगोले (वय २६, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत शनिवारी (दि. २६) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता फिर्यादी यांची सात वर्षाची मुलगी प्रतीक्षा वडिलांसोबत फोनवर बोलत होती. त्यावेळी आरोपीने पाळलेल्या तीन कुत्र्यांपैकी एक कुत्रा घराच्या बाहेर सोडला. त्या कुत्र्याने मुलीच्या पायाचा चावा घेऊन तिला जखमी केले. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी देखील कुत्र्याच्या मालकाला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.