The government is not ready to discuss directly with the farmers

शेतकऱ्यांचे आंदाेलन निमलष्करी दलाच्या बळाच्या जाेरावर चिरडण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. कागदावर असलेल्या शेतकरी संघटनांचा विधेयकाला पाठींबा असल्याचे भासवून केंद्र सरकार आंदाेलनात फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.

पुणे: केंद्र सरकारने अदाणी, अंबानींसाठी कृषी विधेयके मंजुर केली असल्याचा आराेप करीत शेतकरी संघटनांनी आता या उद्याेगपतींकडे माेर्चा वळविला आहे. त्यांच्या दारातच जाऊन आमचा पिच्छा साेडा, आमच्या अन्नात विष कालवू नका असा इशारा शेतकरी संघटना देणार आहेत. २२ डिसेंबर राेजी मुंबईतील रिलायन्स भवनवर माेर्चा काढण्यात येणार आहे अशी माहीती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पत्रकार परीषदेत दिली.

यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डाॅ. बाबा आढाव, प्रतिभा शिंदे, सुभाष वारे, राहुल पाेकळे, प्रा. एस. व्ही. जाधव आदी उपस्थित हाेते.दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदाेलनात सहभाग घेऊन शेट्टी हे पुण्यात आले आहे. उत्तर भारतातील शेतकरी संघटना या दिल्ली येथील आंदाेलनात सहभागी हाेत असुन, देशाच्या इतर भागातील संघटना या संबंधित राज्यात केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरुद्ध आंदाेलन करणार असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले.
‘‘ शेतकऱ्यांचे आंदाेलन निमलष्करी दलाच्या बळाच्या जाेरावर चिरडण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. कागदावर असलेल्या शेतकरी संघटनांचा विधेयकाला पाठींबा असल्याचे भासवून केंद्र सरकार आंदाेलनात फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. या आंदाेलनात तीस शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. या शेतकऱ्यांना २० डिसेंबर राेजी राज्यातील सर्व गावांत मेणबत्ती पेटवून श्रध्दांजली वाहणार आहे. त्यांचे बलीदान व्यर्थ न जाऊ देण्याची शपथ यावेळी घेतली जाणार आहे’’ असेही शेट्टी यांनी नमूद केले.
केंद्र सरकारने हे कायदे शेतकऱ्यांची मागणी नसतानाही केले असुन, त्याचा फायदा हा केवळ अदाणी, अंबानी यांनाच हाेणार आहे या आराेपाचा पुर्नरुच्चार करीत शेट्टी म्हणाले, ‘‘केवळ शेतकरीच नाही तर ग्राहकांची लुट या विधेयकामुळे हाेणार आहे. केवळ पाच पिकांनाच हमी भाव दिला जात आहे, ताे २३ पिकांना द्यावा, हमीभावापेक्षा ताे शेतमाल कमी भावाने खरेदी करू नये अशी सक्ती करावी अशा आमच्या मागण्या आहेत. ज्या उद्याेगपतींसाठी हे कायदे आणले गेले. त्या उद्याेगपतींच्या घरासमाेर आता आम्ही आंदोलन करणार आहाेत. २२ डिसेंबर राेजी मुंबईत असलेल्या रिलायन्स भवन वर माेर्चा आयाेजित केला आहे. या माेर्चात स्वाभीमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेतकरी कामगार पक्ष, लाेक संघर्ष माेर्चा अशा विविध संघटना, डाॅ. बाबा आढाव, जयंत पाटील, बच्चू कडू आदी सहभागी हाेणार आहेत. ’’ अशी माहीती शेट्टी यांनी िदली.

‘‘ कृषी कायद्यासंदर्भात दाखल याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताचा विचार करून केंद्र सरकारने तीनही कायदे रद्द करायला हवेत.’’ राजु शेट्टी

‘‘ शेतकऱ्यांच्या आंदाेलनाला आता शहरी भागातील नागरीकांचा पाठींबा मिळत असुन, त्यांचा सहभाग वाढला आहे. केंद्र सरकार हमी भावावर काहीच बाेलत नाही. ’’ डाॅ. बाबा अाढाव

‘‘ केंद्र सरकारबराेबर झालेल्या चर्चेत कायद्यातील प्रत्येक कलमावर प्रश्न उपस्थित केला गेला. त्याला सरकारने थातुरमातुर उत्तरे दिली आहे. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे सर्व मुद्दे खाेडून काढले आहेत.’’ प्रतिभा शिंदे