‘कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका’ शिक्षण मंडळाचे पालक व विद्यार्थ्यांना आवाहन

विद्यार्थी व पालक यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवा नये आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. सोशल मीडियातून अनेक अफवा पसरत असून त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा गोधळ उडत असल्याचे मत शिक्षण मंडळाने व्यक्त केले आहे.

    राज्यात सर्वत्रच कोरोनाचे रुग्ण वाढ आहे. या वाढत्या प्रादुर्भावातही दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाकडून होणार आहेत. परीक्षेदरम्यान कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यकत्या मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसात दिल्या जाणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

    तोपर्यंत विद्यार्थी व पालक यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवा नये आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. सोशल मीडियातून अनेक अफवा पसरत असून त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा गोधळ उडत असल्याचे मत शिक्षण मंडळाने व्यक्त केले आहे. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा १२ ते २८ एप्रिलदरम्यान होणार आहे. तसेच बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे व तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा ४ ते २२ एप्रिलदरम्यान होणार आहे.

    परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्धीस दिली जातील तसेच शाळांनाही सूचना दिल्या जातील. शिक्षण मंडळाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेस सामोरे जावे.