पुणेकरांनो कठोर निर्णय घेण्यास लावू नका ; अजित पवारांचे नागरिकांना इशारा

पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना ८० जागा जिंकेल. किंग किंवा किंग मेकर असू, असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही अजित पवार यांनी भूमिका मांडली. “प्रत्येकजण पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने भूमिका मांडत असतात. त्यातून त्यांनी मांडली असावी. आगामी महापालिकेत प्रभाग २,३ की ४ करिता अनुकूल आहात का, त्यावर ते म्हणाले की, “सध्याच्या स्थितीला मी तरी २ करिता अनुकूल आहे,” अशी माहिती पवार यांनी दिली.

  पुणे: पुणे आणि पिंपरी येथे आज सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया टप्या टप्याने सुरू करण्यात येणार आहे. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहे. गर्दी अशीच वाढत राहिली तर नाईलाजास्तव काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे. त्यामध्ये एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. हे टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडता तसेच गर्दी न करता कोरोना रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

  पुणे जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. सध्या शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे, याचा अर्थ कोरोना पूर्ण संपला आहे असा होत नाही. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले आहेत.

  संजय राऊतांच्या विधानावर मांडली भूमिका

  पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना ८० जागा जिंकेल. किंग किंवा किंग मेकर असू, असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही अजित पवार यांनी भूमिका मांडली. “प्रत्येकजण पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने भूमिका मांडत असतात. त्यातून त्यांनी मांडली असावी. आगामी महापालिकेत प्रभाग २,३ की ४ करिता अनुकूल आहात का, त्यावर ते म्हणाले की, “सध्याच्या स्थितीला मी तरी २ करिता अनुकूल आहे,” अशी माहिती पवार यांनी दिली.

  नाईलाजाने एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवणार

  अनेक दिवसांपासून सर्व बंद असल्याने नागरिक कंटाळले आहेत. त्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे नागरिक बाहेर पडत आहे. शहरातील दुकाने सुरू करताना व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर ती सुरू करण्यात आली. मात्र सध्या या दुकानासमोर होणारी गर्दी आणखी वाढत असल्याचे दिसून आल्यास नाईलाजाने एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवावे लागतील. या बाबत व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली जाईल. ही वेळ येऊ न देण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे पवार यांनी सांगितले.